जळगाव : रावेर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी (महाविकास आघाडी) शरद पवार पक्षाकडून भाजपमधून आलेले श्रीराम पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली. दरम्यान, पक्षात कमालीची धुसफूस पाहायला मिळत आहे. या नाराजीनाट्यावर पडदा टाकण्यासाठी काल, २० रोजी गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे तळ ठोकून होते. पण कार्यकर्त्यांनी त्यांची जाहीर नाराजी व्यक्त केली. त्यामुळे आज 21 रोजी दस्तूरखुद्द शरद पवार हेच जळगावमध्ये सकाळीच दाखल झाले. शरद पवार यांचे जळगाव विमानतळावर भाजपच्या लोकसभा उमेदवार स्मिता वाघ आणि आमदार सुरेश भोळे यांनी आशीर्वाद घेतले. यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
काय म्हणाल्या स्मिता वाघ ?
आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नेते जे.पी. नड्डा जळगावात येत आहेत. त्यांना रिसिव्ह करण्यासाठी आम्ही येथे आलो आणि योगायोगाने आज शरद पावर साहेब यांची भेट झाली. वडीलधारी या नात्याने मी त्यांचा नमस्कार करणं माझं हे कर्तव्य. त्याप्रमाणे त्यांना नमस्कार केला त्यांनी आशीर्वाद दिला. राजकारणाच्या पलीकडे प्रत्येकाची नाती असतात वडीलधारी या नात्याने मी त्यांचा नमस्कार करणं माझं हे कर्तव्य. त्याप्रमाणे त्यांना नमस्कार केला त्यांनी आशीर्वाद दिला.
आमदार सुरेश भोळे म्हणाले की, भारतीय संस्कृती हे की कोणी वडीलधारी मंडळी आले की त्यांचा सन्मान करणे, आशीर्वाद घेणे आणि आज आम्ही आमचे राष्ट्रीय अध्यक्ष येत आहेत आदरणीय स्मिताताई आणि मी त्यांना रिसीव करण्यासाठी आलो आणि ते समोरून आले त्यामुळे त्यांचे आम्ही आशीर्वाद घेतले आणि मोठ्यांचे आशीर्वाद घेणे आपली भारतीय संस्कृती आहे.