स्वच्छता मोहिम! जिल्हाधिकारी आयुष प्रसाद बनले स्वच्छतादूत; थेट घंटागाडीत सवारी

जळगाव : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज येथे स्वच्छता मोहिमेत थेट घंटागाडीत सवारी करून सर्वांना आश्‍चर्याचा धक्का दिला. कर्मचार्‍यासोबतच त्यांनी स्वत: स्वच्छता मोहिमेत सहभाग घेत  साफसफाई केली. विशेषतः स्वत: कचरा संकलन करणार्‍या घंटागाडीत बसून याबाबतची संपूर्ण माहिती जाणून घेतली. थेट कलेक्टरांनाच घंटागाडीत बसलेले पाहून अनेकांना धक्का बसला. त्यांनी घंटागाडी मध्ये बसून जामनेर शहरांमधील स्वच्छतेची पाहणी केली.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील कामे हे गतीमान आणि सुटसुटीत केली आहेत. यामुळे प्रशासकीय कामांना गती मिळालेली आहे. एकीकडे कार्यालयीन कामांमध्ये सुधारणा करतांनाच त्यांनी ठिकठिकाणच्या भेटीतून आपला ऍक्शन मोड दाखवून दिला आहे. अलीकडेच रावेर तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्तांना स्वत: मैदानावर उतरून मोठा दिलासा दिला होता. यानंतर त्यांनी आज जामनेर येथे स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन प्रशासन हे किती चांगल्या प्रकारे लोकाभिमुख प्रकारे काम करू शकते हे दाखवून दिले आहे.

दरम्यान, आजच्या जामनेर दौर्‍यात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नगरपालिका व अधिकार्‍यांना स्वच्छतेबाबत विविध प्रकारच्या सूचना दिल्या. तसेच स्वच्छता मोहिमेत त्यांनी स्वत: सहभागी होत कचरा संकल्न केले. जामनेर शहरातील नगरपालिका स्वच्छ व सुंदर होऊन देशांमध्ये राष्ट्रपती यांच्या असे दिल्या जाणार्‍या पुरस्कारासाठी आपण प्रयत्न करावा असे आव्हाने केले असून यावेळी जामनेर तहसील कार्यालयामध्ये विविध अधिकार्‍याची बैठका घेऊन जिल्हाधिकारी यांनी आढावा घेऊन जलयुक्त शिवार योजनेतील गावे गाळमुक्त धरण व जलजीवन मिशनची कामे पूर्ण करा व शहरातील रस्त्यावरील अतिक्रमण काढून त्यांचे कायमस्वरूपी त्यांना जागा द्यावे कठोर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी बैठकीतील दिले.  यावेळी प्रांत अधिकारी महेश सुधाळकर, तहसीलदार नानासाहेब आगळे, मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांच्यासह विविध पदाधिकारी माजी नगरसेवक अधिकारी यावेळी उपस्थित होते.