स्वत:ला धुरंदर समजणार्‍यांनाही देवेंद्र पुरुन निघाले; चंद्रकांत पाटलांचा पवारांना टोला

पुणे : महाराष्ट्रमध्ये माझ्या एवढा धुरंदर नाही, असं वाटणार्‍या लोकांना देवेंद्र पुरून उरले. अशी टीका भाजप नेते चंद्रकात पाटील यांनी शरद पवारांचं नाव न घेता केली. देवेंद्रजींना ते बोललेली गोष्ट कधीच मागे घ्यावी लागली नाही. पुण्यात एकाही पठ्ठ्याची हिंमत झाली नाही, देवेंद्रजींच्या बोलण्यावर आक्षेप घ्यायची, कारण त्यांचे भाषण अभ्यासपूर्वक असतं, असेही पाटील यांनी नमूद केलं.

भाजपनेते तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील टीका टिप्पणी दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे. पाटील यांनी आज शरद पवार यांचे नाव न घेता राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. आधी दोन भोंगे वाजायचे सकाळी संजय राऊत आणि संध्याकाळी नवाब मलिक, मात्र देवेंद्रजींनी सगळा अभ्यास करून पुरावे शोधून काढले. त्यामुळे दोघांची रवानगी कारागृहात झाली. तसेच देवेंद्र यांच्यामुळे अनेकाचे विदेश दौरे बंद झाले. मी जर देश सोडून गेलो तर देवेंद्रजी इथे काय करतील, या भीतीमुळेच हे दौरे बंद झाल्याचं पाटील म्हणाले.