तरुण भारत लाईव्ह । २२ सप्टेंबर २०२३। आपण झोपेत असताना आपल्याला स्वप्न पडतात. झोपेत सगळ्यांनाच स्वप्न पडतात असे नाही. काहींना कधी खूप चांगले तर कधी खूप वाईट स्वप्न पडतात. प्रत्येक स्वप्नाचा काही ना काही अर्थ नक्कीच असतो. काहींना आपल्याला झोपेत पडलेली स्वप्नने लक्षात राहतात तर काही लगेच विसरूनही जातात. पण तुम्हाला माहित आहे का? आपल्याला जे काही स्वप्न पडते तर त्याचा काही अर्थ असतो. याबाबत स्वप्न्शास्त्र काय सांगते हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
स्वप्नात प्रेतयात्रा दिसणे
स्वप्नात जर प्रेतयात्रा दिसली तर घाबरून जाऊ नका हे तर शुभ लक्षण आहे. हे स्वप्न असं सांगत कि येणाऱ्या काही दिवसात आपली एक महत्वाची इच्छा किंवा स्वप्न पूर्ण होणार आहे.
स्वप्नात बगीचा पाहणे
लाल फुलांची बाग पहाणे हे स्वप्न खूप चांगले मानले जाते. हे स्वप्न येणाऱ्या आर्थिक सुबत्तेकडेही ते निर्देश करते. तुम्हाला आर्थिक प्राप्ती चांगली होणार आहे. असा या स्वप्नाचा अर्थ असतो.
स्वप्नात देवाला पाहणे
स्वप्नात देवाला पाहणे हे स्वप्न अतिशय शुभ आहे. या स्वप्नाचा अर्थ असा असतो कि देव तुमच्यावर प्रसन्न आहे. आणि येणाऱ्या दिवसात तुम्हाला भरपूर यश मिळणार असल्याचे हे स्वप्न दर्शवते.