स्वप्नात ‘या’ गोष्टी पाहणे असते शुभ; जाणून घ्या स्वप्नशास्त्राचा अर्थ

तरुण भारत लाईव्ह । १३ ऑक्टोबर २०२३। रात्री झोपल्यानंतर बहुतेक लोकांना स्वप्न पडत असतात. काही लोक असा विचार करतात की आपण झोपेच्या आधी विचार करतो त्या गोष्टी स्वप्नात देखील दिसतात. स्वप्नात पाहिलेल्या गोष्टी भविष्याचे संकेत दर्शवितात. काही स्वप्न शुभ संकेत देतात तर काही स्वप्न अशुभ संकेत देत असतात. स्वप्नात कुठल्या गोष्टी पाहणे हे शुभ असते हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

स्वप्नात स्वताःचा मृत्यू दिसणे हा एक शुभ संकेत असतो. असे स्वप्न पडले तर चिंतेचे काही कारण नाही. स्वप्नात स्वतःचा मृत्यू दिसला तर तुमच्या जीवनात आनंद येणार आहे असा या स्वप्नाचा अर्थ असतो. स्वप्नात जर तुम्हाला पोपट दिसत असेल तर हे सुद्धा शुभ स्वप्न आहे. या स्वप्नाचा अर्थ असा होतो कि तुमची आर्थिक परिस्थिती सुधरणार आहे. स्वप्नात फळांची बाग दिसली तर ते तुमच्या चांगल्या भविष्याचे लक्षण आहे. या स्वप्नाचा अर्थ असा आहे की तुमच्या आयुष्यात आनंद येणार आहे.

जर आपण आपल्या स्वप्नात कुठल्या वस्तूचे बांधकाम होताना पाहिले असेल. याचा अर्थ असा की आपल्याला आपल्या कामात यश मिळेल. एखाद्या व्यक्तीला स्वप्नात चांदीने भरलेला कलश दिसला तर या स्वप्नाचा अर्थ असा होतो की लवकरच देवी लक्ष्मी आपला आशीर्वाद देणार आहे. हे स्वप्न एक चांगले भविष्य दर्शवते. जर तुम्ही स्वप्नात विवाहासाठी वस्त्र परिधान केलेली वधू पाहिली तर तुमच्या जीवनात आनंद निर्माण होण्याचे हे संकेत असतात. तुम्हाला लवकरच एखादी चांगली बातमी समजेल तसंच घरात धनलक्ष्मीचं आगमन होणार आहे.

स्वप्न शास्त्रानुसार, स्वप्नात लहान मूल किंवा मुलगी नाचताना पाहणे हे जीवनात धन आणि वैभव वाढवण्याचे लक्षण आहे. स्वप्नात देवता पाहिल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात असे स्वप्न शास्त्र सांगते. स्वप्नात झाडू पाहणे म्हणजे माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करणे होय. आणि असे स्वप्न दिसल्यास प्रथम आई किंवा पत्नीला त्या स्वप्नाबद्दल सांगितल्याने फळ अनेक पटींनी वाढते.