नवी दिल्ली । सध्याच्या महागड्या गॅस सिलिंडरने सर्वसामान्यांचे महिन्याचं बजेट कोलमडून गेलं आहे. जर तुम्हीही महागड्या गॅस सिलिंडरमुळे हैराण असाल तर तुम्हाला टेन्शन घेण्याची अजिबात गरज नाही. कारण आता तुम्ही मोफत अन्न शिजवू शकता म्हणजे तुम्हाला स्वयंपाक करण्यासाठी एलपीजी सिलिंडरची गरज भासणार नाही.
देशभरात स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात झपाट्याने वाढ झाल्यानंतर लोक आता स्वयंपाकासाठी वेगवेगळे पर्याय शोधत आहेत. अलीकडे, सरकारने स्वयंपाक करण्याची एक नवीन पद्धत आणली आहे, ज्याद्वारे तुम्ही स्वस्तात अन्न शिजवू शकता. केंद्र सरकारने नवीन सोलर स्टोव्ह आणला आहे, ज्यामुळे तुम्ही एलपीजी सिलेंडरशिवाय स्वयंपाक करू शकता. हा सोलर स्टोव्ह सूर्यप्रकाशात काम करतो. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळू शकतो.
IOCL ने नवीन सुविधा सुरु केली
देशातील सरकारी तेल कंपनी इंडियन ऑइल लिमिटेडने असे एक खास उपकरण लाँच केले आहे ज्याद्वारे तुम्ही गॅसशिवाय स्वयंपाक करू शकता. इंडियन ऑइल (IOCL) ने सोलर स्टोव्ह सूर्या नूतन लाँच केले आहे. हा सोलर स्टोव्ह इंडियन ऑइल R&D सेंटर, फरीदाबाद द्वारे उत्पादित केला जातो.
स्टोव्हची किंमत किती आहे
सोलर स्टोव्हची किंमत 12,000 रुपये आहे आणि टॉप मॉडेलची किंमत 23,000 रुपये आहे. हा स्टोव्ह खरेदी करण्यासाठी तुमचे पैसे फक्त एकदाच खर्च होतील, परंतु त्यानंतर तुम्ही पैसे वाचवू शकता कारण तुम्हाला एलपीजी गॅस सिलेंडर भरावा लागेल.या सौर स्टोव्हबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही अधिकृत लिंकला भेट देऊ शकता https://iocl.com/pages/SuryaNutan.