जळगाव । सोने आणि चांदी खरेदीची योजना आखणाऱ्या ग्राहकांसाठी सर्वात मोठी संधी चालून आली आहे. उच्च पातळीवरून सोने आणि चांदीचे भरच खाली आहे. गेल्या आठवड्याच्या पहिल्या दिवसापासून सुरू झालेल्या सोन्या-चांदीच्या किमतीतील घसरणीचा कल या आठवड्याच्या दुसऱ्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजे आज (मंगळवार)ही कायम असल्याचा दिसून आला.
MCX वरील दर
MCX वर आज सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. आज (मंगळवार) MCX वर सोने 1.55 टक्क्यांच्या घसरणीसह 56,709 रुपयांवर म्हणजेच 891 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ट्रेंड करत आहे. तर चांदीचा भाव 4.26 टक्क्यांनी म्हणजेच 2977 रुपयांनी घसरून 66,880 रुपयांवर ट्रेंड करत आहे.
सोने 5154 रुपयांनी स्वस्त
उच्चांक पातळीवरून सोने बरेध खाली आहे. यापूर्वी 6 मे रोजी MCX वर सोन्याची किंमत 61,845 रुपये प्रति 10 ग्रॅम या विक्रमी पातळीवर होती आणि आज MCX वर सोन्याची किंमत 56691 रुपये प्रति 10 ग्रॅम या पातळीवर आहे. त्यानुसार सध्या सोने 5154 रुपयांनी स्वस्त होत आहे.