तरुण भारत लाईव्ह । २० सप्टेंबर २०२३। सर्वत्र गणेशउत्सव सुरु झाला असून या गणेशउत्सवात वेगवेगळ्या पद्धतीचे पदार्थ बनवून बाप्पाला अर्पण केले जातात. बाप्पाच्या नैवैद्यासाठी तुम्ही खजुराचे लाडू तयार करू शकता. खजुराचे लाडू कसे तयार करतात हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
साहित्य
खजूर, बदाम, सुक खोबर, खसखस, वेलदोडे पूड, सुकामेवा.
कृती
सर्वप्रथम, खजूर स्वच्छ धुवून घ्यावेत. यानंतर खजूर बारीक करून घ्या. नंतर एका कढईत तूप घालून तूप वितळवून घ्या. यानंतर तुपात सुकामेवा २ मिनिटे तुपात परतवून घ्या. यानंतर सुकामेवा एका ताटलीत काढून घ्या. यानंतर त्यात पीठ घालून ते ब्राऊन होईपर्यंत चांगले परतून घ्या. नंतर एका मोठ्या भांड्यात या सर्व गोष्टी एकत्र करून नीट मिक्स करा. यानंतर हे मिश्रण थोडे थंड झाल्यावर त्यातून मध्यम आकाराचे लाडू बनवा.