हंगामातील सर्वोत्तम फेकीने नीरजनं जिंकलं गोल्ड

एशियन गेम्स 2023 मध्ये आज पुरूष भालाफेक स्पर्धेत दोन भारतीयांनी दमदार कामगिरी केली. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असणाऱ्या नीरज चोप्राला भारताच्याच किशोर कुमार जेनाने सुवर्ण पदकासाठी कडवे आव्हान दिले.

अखेर नीरज चोप्राने आपली हंगामातील 88.88 मीटर ही सर्वोत्तम कामगिरी करत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. तर किशोर कुमार जेनाने देखील आपली वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी (87.54 मीटर) करत रौप्य पदकावर आपले नाव कोरले.