चंद्रपूर : चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात आज मंगळवारी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. पहाटे सर्वत्र विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. यावेळी लालपेठ परिसरातील हनुमान मंदीरावर वीज कोसळली. यावेळी एका कुटुंबाच्या विवाहाची वरात मंदिरात आली होती. नवरदेव हनुमान मंदिरात दर्शनासाठी गेला असता मंदिरावर वीज कोसळली. सुदैवाने नवरदेव व अन्य वराती मंदीराच्या आत असल्याने जीवीतहानी टळली.
या जिल्ह्यात तथा पहाटेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. लालपेठ परिसरात हनुमान मंदिरावर वीज कोसळली. नेमके याच वेळी या प्रभागातील शिरसागर कुटुंबाच्या विवाहाची वरात मंदिरात आली होती. याच पावसात लालपेठ परिसरातील हनुमान मंदीरावर वीज कोसळली. या वेळी हनुमान दर्शनासाठी मंदिरात नवरदेव गेला असता थोडक्यात बचावला. वीज मंदिराच्या कळसावर पडल्याने कळसाचा काही भाग तुटला व कळस काळा पडला.
एक नवरदेव मंदिरात दर्शनाला गेला होता तो बाहेर निघताच वीज पडली, बसच्या काचा फुटल्या नवरदेव यात थोडक्यात बचावला, या नवरदेवाची वरात भंडारा जिल्ह्यात निघाली होती. देव दर्शनानेच नवरदेव बचावला अशी चर्चा आहे. दरम्यान मंदिराच्या कळसावर वीज पडल्याने कळस तुटला आणि काही भाग काळा पडला आहे.