हमासने इस्रायलवर केलेल्या दहशतवाही हल्ल्यात आतापर्यंत १२०० पेक्षा जास्त इस्रायली नागरिकांचा बळी गेला आहे. संकटकाळी इस्त्राईलला संपूर्ण जगातून पाठिंबा मिळत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा इस्त्रायलच्या पंतप्रधानांशी फोनवरुन चर्चा केली. त्यासोबतच भारताने इस्त्राईलला पाठिंबा दिला.
पण भारतात काही कट्टरपंथी लोकांनी भारत सरकारच्या अधिकृत भूमिकेच्या विरोधात जाऊन हमासच्या समर्थनात रॅली आणि मोर्चे आयोजित केले आहेत. या सर्व कट्टरपंथी लोकांना आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी निर्वाणीचा इशारा दिला आहे.
इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाबाबत भारताकडून उचलण्यात येत असलेल्या पावलांबाबत जर कोणी टिप्पणी केली तर त्या व्यक्तीवर कठोर कारवाई केली जावी, असे निर्देश उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पोलिस प्रशासनाला दिले आहेत.
गेल्या आठवड्यात इस्रायली सैन्य आणि हमास यांच्यात युद्ध सुरू झाल्यानंतर देशातील काही कट्टरपंथी मानसिकतेच्या लोकांनी हमाससारख्या दहशतवादी संघटनेच्या हल्ल्याचे समर्थन केले आहे. ९ ऑक्टोबर रोजी अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या शेकडो विद्यार्थ्यांनी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ कॅम्पसमध्ये निदर्शने केली होती. यामुळेच योगी आदित्यनाथ यांनी पोलिस प्रशासनला हे आदेश दिल्याचे बोलले जात आहे.