हमास-इस्रायलच्या तणावाचा सोने-चांदीवर परिणाम ; एकाच दिवसात मोठी वाढ

जळगाव : मागील काही काळात सोने आणि चांदीच्या कितमीत सातत्याने बदल होताना दिसतोय. कधी स्वस्त तर कधी महाग होताना दिसत आहे. यातच मागील पधंरा दिवसात सोन्याच्या किमतीत मोठी घसरण दिसून आली सोबतच चांदीच्या किमतीत देखील घसरण दिसून आली.

त्यामुळे गेल्या महिन्यात ५९ हजारांवर असलेला तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५७ हजाराच्या घरात आला. तर चांदीचा दर ७० हजावरून ६७ हजाराच्या घरात आला होता. सात महिन्यांतील नीचांकी भाव होते. मात्र यातच आता हमास व इस्रायल यांच्यातील तणावानंतर पुन्हा वाढू लागले आहे. त्यामुळे सोने आणि चांदीने पुन्हा उसळी घेतली

शनिवार, ७ ऑक्टोबर रोजी चांदीच्या भावात एकाच दिवसात एक हजार ६०० रुपयांची वाढ झाली. तसेच, सोन्याचेही भाव ३०० रुपयांनी वधारले. त्यामुळे चांदी पुन्हा ६९ हजार रुपयांच्या पुढे जाऊन ती ६९ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. सोनेदेखील ५७ हजार ९०० रुपये प्रति तोळा झाले.

गणेशोत्सव संपल्यानंतर पितृपक्ष सुरू झाला व सोने-चांदीचे भाव कमी होऊ लागले. आठवडाभरात सोने एक हजार ४०० रुपयांनी, तर चांदी चार हजार १०० रुपयांनी घसरली.  त्यानंतर मात्र इस्रायल व हमास यांच्यातील तणावाचे रूपांतर हल्ल्यात होऊन हमासने पाच हजारपेक्षा जास्त रॉकेट इस्रायलवर डागले. त्यात अमेरिकेने या हल्ल्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर आर्थिक घडामोडींवर मोठा परिणाम होणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. त्यात सोने-चांदीवर तर आंतरराष्ट्रीय घडामोडींचा लगेच परिणाम होतो.