जळगाव । राज्यावरील अवकाळी पावसाचं संकट कायम असून अशातच आता पुन्हा एकदा राज्यातील जिल्ह्यांना गारपिटीसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आधीच झालेल्या अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असता त्यात आता नव्या अंदाजानुसार शेतकऱ्यांचे आणखीन नुकसान होण्याची शक्यता आहे.
या भागात पावसाचा इशारा यलो अलर्ट
नाशिक, नगर, पुणे, परभणी, हिंगोली, नांदेड या भागात वादळी पाऊस, गारपिटीचा इशारा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे या भागातील शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
याचबरोबर वादळी पावसाचा इशारा यलो अलर्ट पालघर, ठाणे, रायगड, मुंबई, रत्नागिरी, नंदूरबार, धुळे, जळगाव, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, बीड, लातूर, बुलढाणा, अमरावती, वाशीम, अकोला, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली याभागात इशारा देण्यात आला आहे.
ढगाळमुळे जळगावातील उन्हाचा पारा घसरला :
दरम्यान, जळगाव जिल्ह्यात मागील दोन तीन दिवसापासून दिवसभर काहीसे मळभी ढगाळ वातावरण कायम होते. यामुळे उन्हाचा पारा काहीसा घसरला आहे. 41 अंशावर असलेला पारा बुधवारी 39 अंशावर आला होता. उकाड्याने हैराण झालेल्या जळगावकरांना काहीसा दिलासा मिळाला खरा पण या अवकाळी पावसामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. जळगावला 29 एप्रिल पर्यंत येलो अलर्ट देण्यात आल्याने वातावरणीय स्थिती अशीच एक दोन दिवस कायम रहाणार आहे.