चोपडा : हवेतील प्रदूषण ओळखणा-या यंत्राबाबत समाजकार्य महाविद्यालयातील प्राध्यापक चमूने यापूर्वी प्रकाशित केलेल्या शोध निबंधाला एक पब्लिश पेटंट म्हणून भारत सरकारकडून सामूहिकरित्या जाहीर केले आहे.
या शोधनिबंधाची निर्मिती प्रा.डॉ.जगदीश सोनवणे, प्राचार्य डॉ.पी. एस.पाटील,प्रा.डॉ.राहुल निकम( चोपडा), प्रा.डॉ.घनश्याम जगताप (नासिक)प्रा.डॉ.निलेश गायकवाड (तळोदा) यांनी संयुक्त प्रयत्नातून हवेतील प्रदूषण ओळखणाऱ्या यंत्राची प्रतिकृती तयार केलेली आहे. या प्रतिकृतीला भारत सरकारने पेटंट म्हणून मान्यता दिलेली आहे.
मानव समाजाला प्रदूषणाच्या या गंभीर समस्येतून बाहेर काढण्यासाठी काय करता येईल याचा गांभीर्याने विचार करत असताना त्यांनी हवेतील प्रदूषणाची पातळी शोधणाऱ्या यंत्राची प्रतिकृती तयार केली. ही प्रतिकृती बंद खोलीतील किंवा नियंत्रित वातावरणातील प्रदूषण ओळखणाऱ्या यंत्राची प्रतिकृती आहे. या प्रतिकृतीच्या माध्यमातून बंद खोलीतील किंवा नियंत्रित वातावरणातील प्रदूषणाचे प्रमाण आणि त्यावर उपाययोजना हे निश्चित करता येणार आहे. या प्रतिकृतीचा उपयोग वातावरणातील प्रदूषण कमी करून मानवी जीवन अधिक सुखकारक आणि प्रदूषणमुक्त करण्याकरता भविष्यात होणार आहे .
या प्राध्यापक चमुचे हे दुसरे पेटंट आहे. याबद्दल अरुणभाई गुजराथी (माजी विधानसभा अध्यक्ष,महाराष्ट्र राज्य,मुंबई), आशिष गुजराथी,संस्थाध्यक्षा पुनम गुजराथी,सचिव अश्विनी गुजराथी, सर्व समाजकार्य महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी वृंद आणि विद्यार्थ्यांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.