हा घ्या पुरावा..! फडणवीसांनी ‘तो’ फोटो शेअर करत विरोधकांची बोलती केली बंद

मुंबई । राम मंदिर आंदोलनासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थिती संदर्भात प्रश्न उपस्थित करणाऱ्या विरोधकांना आता देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. फडणवीस यांनी एक फोटो ट्विट करत विरोधकांना चपराक दिली. राम मंदिर आंदोलनातील या फोटोत देवेंद्र फडणवीस दिसत आहेत.

फडणवीस नेमकं काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीस यांनी फोटो ट्विट करताना म्हटले की, जुनी आठवण…नागपूरहून प्रकाशित होणार्‍या ‘दै. नवभारत’ने मला हे छायाचित्र आवर्जून पाठविले. अयोध्येला जाणार्‍या कारसेवकांची नागपूर रेल्वे स्थानकावर गर्दी उसळली. तेव्हाचे हे छायाचित्र. छायाचित्रकार शंकर महाकाळकर यांनी ते टिपले आहे. उद्या (22 जानेवारी) अयोध्येत प्रभूश्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा होत असताना या छायाचित्राच्या माध्यमातून जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे, असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.


दरम्यान, बाबरी मशीद पडली त्यावेळी भाजपवाले बिळात लपले होते, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली होती. या टीकेला देखील त्यांनी जोरदार प्रत्त्युत्तर दिल. बाबरीचा ढाचा पडत असताना आपण त्या ठिकाणी होतो. याचा आपणास अभिमान आहे. या आंदोलनाच्या वेळी अनेक कारसेवकांना अटक झाली होती. त्यात आपणही होते, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. ते बदायू येतील तुरुंगात ठेवले होते. परंतु शिवसनेनेचे लोक दिसले नव्हते. देवेंद्र फडणवीस यांनी वृत्तपत्रात प्रकाशित हे छायाचित्र जारी करुन पुरावे मागणार्‍या उद्धव ठाकरे, संजय राऊतांची बोलती बंद केल्याचे बोलले जात आहे.