सातारा : जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्हास्तरीय कार्यशाळा आणि जिल्ह्यातील विविध पाणीपुरवठा योजनांचा ई भूमिपूजन सोहळ्यात तुफान फटके बाजी केली आहे.
काय म्हणाले ना.पाटील?
आम्ही लग्नात गेलो तर हसतो, मयतीत गेलो तर रडल्यासारखं करतो. वाढदिवसाला गेलो तर हॅपी बर्थ डे म्हणतो हा रोल काही साधा नाही. चांगल्या चांगल्या ॲक्टरांनी आमच्यासारखी ॲक्टिंग करून दाखवावी; असे ओपन चॅलेंज मंत्री गुलाबराव पाटील यांनी अभिनेत्यांना दिले आहे.
तसेच माझ्याकडे पाणी पुरवठा खाते असल्याने आज कोणताही आमदार मला भेटल्याशिवाय जाऊ शकत नाही. आम्ही माणसात राहून मानसाळलेली माणसे आहोत. त्यामुळे सकाळी ५–२५ माणसे कमी आली की असे वाटतं हवा कमी झाली का काय? आमची ओपिडी चालली पाहिजे. आम्ही तर बदनाम जात आहे, असेही ते म्हणाले.