मुंबई : अफगाणिस्तानविरुध्द दिल्ली येथे सुरू असलेल्या विश्वचषकातील सामन्यात भारताने २७३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ७ षटकांत ६४ धावा केल्या आहेत. रोहित शर्माने तुफानी खेळी करत अर्धशतक ठोकले. त्याने मात्र ३० चेंडूत आपले यंदाच्या विश्वचषकातील पहिले अर्धशतक साजरे केले. सध्या इशान किशन आणि रोहित शर्मा यांच्यात ७४ धावांची महत्त्वपूर्ण ओपनिंग पार्टनरशिप झाली आहे.
भारत विरुध्द अफगाणिस्तान यांच्यात दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर सामना खेळविण्यात येत आहे. अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने ८ बाद २७२ धावा केल्या. यात सर्वाधिक धावा हश्मतुल्लाह शाहिदी याने ८८ चेंडूत ८० धावा केल्या. तर अझमतुल्लाह ओमरझाई (६९ चेंडूत ६२ धावा) याच्या सोबतीने चौथ्या विकेट्ससाठी १२१ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली.
भारताकडून गोलंदाजी करताना स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह मात्र ३९ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. तर ऑलराऊंडर हार्दिक पंड्याने अफगाणिस्तानच्या दोन खेळाडूंना तंबूत धाडले. अफगाणिस्तानने दिलेल्या २७३ धावांचा पाठलाग करण्यासाठी भारतीय फलंदाज तयार असून संघ दुसरा विजय साकारण्यासाठी मैदानात उतरेल.