हिरोची आयकॉनिक बाईक karizma XMRला सर्वाधिक पसंती; नवरात्री पासून डिलिव्हरी उपलब्ध

तरुण भारत लाईव्ह । ५ ऑक्टोबर २०२३। हिरोची आयकॉनिक बाईक karizma XMR बाईक २९ ऑगस्ट रोजी लाँच केली. या बाईकची डिलिव्हरी नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून या बाईकची डिलेव्हरी केली जाईल. karizma XMR चे स्पेसिफिकेशन्स काय आहे आणि याची किंमत काय आहे हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

या बाइकमध्ये 210 cc लिक्विड कूल्ड  इंजिन असून हे इंजिन 7250 rpm वर जास्तीत जास्त 20.4 Nm टॉर्क आणि 9250 rpm वर 25.5 PS पॉवर जनरेट करत असते. कंपनीने या बाईकमध्ये 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन दिले आहे. त्याचबरोबर बाइकमध्ये स्लिप आणि असिस्ट क्लच देण्यात आला आहे.  या बाइकमध्ये  नेव्हिगेशन फीचर देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे अ‍ॅडजस्टेबल विंडशील्डही देण्यात आली आहे. या बाइकला क्लास-डी एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प देण्यात आले आहेत. ही बाईक ब्लॅक, रेड आणि yellow कलर उपलब्ध आहे.

या बाईकची एक्स-शोरूम किंमत १.७२ लाख रुपये निश्चित केली गेली होती. नंतर कंपनीने बाईकची किंमत वाढवली आणि बाईकची सुरुवातीची किंमत १.७९ लाख रुपये आहे, जी एक्स-शोरूम किंमत आहे.