---Advertisement---

‘ही’ नोकरी आवडेल का? फक्त कुत्र्याचा संभाळ करायचा, मिळणार तब्बल १ कोटी रुपये पगार

---Advertisement---

job : अथक मेहनत घेतल्यानंतर देखील अनेकांच्या हाती नोकरी नाही. अशात ज्यांच्याकडे नोकरी आहे ते आणखी जास्त पगाराच्या नोकरीसाठी धडपड करतात. त्यामुळे अशा सर्व तरुणांसाठी एक अजब आणि नशिब पालटणारी भरती समोर आली आहे.

काही वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या नोकरीचं ठिकाण लंडन आहे. फायटरफौक्ट्स आणि केसिंग्टन येथे असलेली भरती एजन्सी जॉर्ज राल्फडन यांच्यामार्फत या भरतीची जाहिरात देण्यात आली आहे. त्यामुळे नोकरीसाठी तुम्हाला लंडन गाठावं लागेल.

येथे नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्याला पगारासह विविध सुविधा देखील दिल्या जातील. त्या व्यक्तीची राहण्याची व्यवस्था, तिन्ही वेळचे पौष्टिक जेवण मिळेल. इतकेच नाही तर दर वर्षी ६ आठवडे म्हणजे ४२ दिवसांची सुट्टी दिली जाणार आहे. तसेच कुत्र्यासह प्रायवेट जेटमध्ये फिरण्याची संधी देखील मिळेल.

पात्रता काय आहे?
नोकरी मिळवण्यासाठी विशेष डिग्रीची आवश्यता नाही. मात्र तुम्हाला कुत्र्यांचा संभाळ करता आला पाहिजे. तुम्हाला तुमच्या खाजगी आयुष्यापेक्षा कुत्र्यांना जास्त महत्व द्यावे लागेल. लंडनमध्ये राहणाऱ्या एका अरबपती कुटुंबाकडे दोन कुत्रे आहेत. त्यांचा संभाळ करण्यासाठी त्यांनी भरती काढलीये. अनेक माध्यमांवर ही माहिती देण्यात आलीये.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment