कडक कायदे असूनही हुंडा मागणारे त्यांच्या गैरकृत्यांपासून परावृत्त होत नाहीत. असाच एक प्रकार समोर आला आहे. लग्नाच्या चार वर्षानंतर हुंडा म्हणून बाईक न मिळाल्याने एका व्यक्तीने पत्नीला घराबाहेर फेकले. तसेच पत्नीचा फोटो एडिट करून सोशल मीडियावर व्हायरल केला होता. त्यावर आक्षेपार्ह टिप्पणीही करण्यात आली होती. पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी पती आणि सासरच्यांविरोधात एफआयआर दाखल केला आहे.
विवाहित महिलेने आरोप केला आहे की, 19 जून 2019 रोजी आकाशसोबत तिचा विवाह झाला होता. लग्नानंतर पती आकाश, सासरा राम स्वरूप, सासू मीना, मेव्हणा सतपाल आणि सतपालची पत्नी दुर्गेश यांनी हुंड्यात दुचाकीची मागणी करण्यास सुरुवात केली.
तक्रार केल्यानंतर प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. रामगंगा चौकीवर दोन्ही पक्षांमध्ये आता एकमेकांची पर्वा न करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतरही आकाश दररोज पत्नीचा छळ करू लागला. जीवे मारण्याच्या धमक्या द्यायचा. तो अनेकदा पत्नीला रस्त्यात अडवून शिवीगाळ करायचा आणि तिने विरोध केल्यावर तिला मारहाण करायचा.
विवाहित महिलेचा आरोप आहे की तिच्या पतीने तिची आई, दोन भाऊ, बहीण आणि मेहुणीचे फोटो आणि व्हिडिओ एडिट करून सोशल मीडियावर अपलोड केले. त्यावर आक्षेपार्ह टिप्पणीही करण्यात आली आहे. विवाहित महिलेने सांगितले की, तिच्याकडे व्हिडिओचे स्क्रीनशॉट्स आणि सोशल मीडियावर केलेल्या चुकीच्या पोस्ट्स आहेत. महिलेच्या तक्रारीवरून बिथरी पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे.
पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर पतीसह सर्व आरोपी फरार झाले. पकडण्यासाठी पोलीस नातेवाईकांकडे छापेमारी करत आहेत. लवकरच आरोपींना अटक करून तुरुंगात पाठवले जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात हा प्रकार समोर आला आहे