---Advertisement---
तरुण भारत लाईव्ह ।१४ फेब्रुवारी २०२३। औरंगाबादमधून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. आपल्या पोटच्या दोन मुलाची आईने झोपेत तोंड दाबून हत्या केल्याची घटना घडली आहे. या हत्येचे कारण समोर आले आहे.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबादमधील सादातनगरच्या गल्ली क्रमांक तीनमध्ये घडली. मला मुलं सांभाळणं असह्य झाले होते. मला त्यांची कोणतीच गोष्ट सहन होत नव्हती. त्यांच्यामुळे सतत चीडचीड होत असल्याने मी त्या दोघांचा जीव घेतला, अशी कबुली आईने दिली आहे. अदिबा फहाद बसरावी (वय -६ वर्षे), व अली फहाद बसरावी (वय -४ वर्षे दोन्ही राहणार सादातनगर, औरंगाबाद) अशी मृत चिमुकल्यांची नावे आहेत. तर आलीया फहाद बसरावी, असे हत्या करणाऱ्या निर्दयी आईचे नाव आहे.
६ फेब्रुवारी रोजी सहा वर्षीय आदिबा आणि चार वर्षीय आली यांची झोपेत कापडाने तोंड दाबून जन्मदात्या आईनेच हत्या केली होती. हत्येच्या कबुलीनंतर सातारा पोलिसांनी आई आलीया हिला अटक केली होती. मात्र, हत्या का केली हे पोलिसांना ती सांगत नव्हती. आता तिची न्यायलातीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पोलिसांनी आलियाच्या माहेर आणि सासरकडील मंडळींची चौकशी केली असता कुठलाही वाद नसल्याचे समोर आले. तर आलिया काही काळापूर्वी माहेरी जाऊन आली होती. चौकशी दरम्यान आलिया दोन्ही मुलावर चिडचिड करायची, अशी माहिती समोर आली आहे.
---Advertisement---