---Advertisement---

हृदयद्रावक! दारू पाजली, दगडाने ठेचले डोके; प्रेयसीच्या पतीला उठवलं आयुष्यातून

---Advertisement---

प्रेमात अडथळा ठरणाऱ्या प्रेयसीच्या पतीची निर्घृण हत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पोलिसांना तरुणाचा मृतदेह 1 डिसेंबर रोजीच सापडला होता. मात्र पोलिसांनी आता या हत्येचे गूढ उकलले आहे. 34 वर्षीय आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींनी आधी मयत तरुणाला दारू पाजली आणि नंतर त्याची हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

काही दिवसांपूर्वी मृत तरुणाचा मृतदेह निर्जन ठिकाणी आढळून आला होता. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांचे पथक तपास करत होते. स्थानिक नागरिकांच्या प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांनी योगेश कांबळे असे मृताचे नाव सांगितले. रवींद्र सूर्यमणी गिरी असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश कांबळे हा मजुरीचे काम करायचा. रवींद्र सूर्यमणी याचे योगेश कांबळे यांच्या पत्नीशी प्रेमसंबंध होते. हा प्रकार योगेश यांना कळला. त्यानंतर योगेश त्याच्या पत्नीला त्रास देत असे. त्यामुळे प्रियकर रवींद्रने त्याच्या हत्येचा कट रचला.

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी रवींद्र गिरी याला अटक करण्यात आली आहे. या संदर्भात भारतीय दंड संहितेच्या कलम 302 नुसार आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत कांबळे यांचा मृतदेह १ डिसेंबर रोजी पोलिसांना सापडला होता. त्यांच्या डोक्यावर खोल जखमेच्या खुणा होत्या. कांबळे याला निर्जन ठिकाणी बोलावून दारू पाजल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले. तो दारूच्या नशेत असताना त्याच्या डोक्यात दगडाने वार करून त्याची हत्या केली. मुंबईतील कांदिवली येथे ही घटना घडली आहे.

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment