झारखंडमधील जमीन घोटाळा प्रकरणी माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवार, ३१ जानेवारी राेजी अटक केली हाेती. तत्पूर्वी त्यांनी झारखंडच्या राज्यपालांकडे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सुपूर्त केला होता. दरम्यान अटकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती; परंतु सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण झारखंड उच्च न्यायालयात दाखल करण्याचा सल्ला दिला होता. हे प्रकरण उच्च न्यायालयात दाखल केल्यानंतर न्यायालयाने ‘ईडी’ला नाेटीस बजावत या कारवाई प्रकरणी उत्तर देण्यास सांगितले आहे.
हेमंत सोरेन अटक प्रकरण; झारखंड उच्च न्यायालयाची ‘ईडी’ला नोटीस
Updated On: एप्रिल 29, 2024 11:12 am

---Advertisement---