तरुण भारत लाईव्ह । २८ सप्टेंबर २०२३। हॅरी पॉटर ही जे. के. रोलिंग ह्या ब्रिटिश लेखिकेने तयार केलेली ७ कादंबऱ्यांची शृंखला आहे. आजही जगभरात ‘हॅरी पॉटर’ची खूपच क्रेझ आहे. हॅरी पॉटर’ लहान मुलांना आवडत असल्यामुळे ‘हॅरी पॉटर’ मधील प्रत्येक कलाकाराने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.या चित्रपटामध्ये मिस्टर डंबलडोअरचे पात्र साकारणाऱ्या एका प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन झाले आहे. मायकेल गॅम्बॉन यांचं वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झालं आहे.
मायकेल गॅम्बॉन यांनी ‘हॅरी पॉटर’ चित्रपटामध्ये मिस्टर डंबलडोअरचे पात्र साकारले होते. त्यांनी ते पात्र साकारल्या नंतर जगभरात त्यांचा मोठ्याप्रमाणात चाहतावर्ग तयार झाला होता. मायकेल गॅम्बॉन यांचे निधन न्यूमोनियामुळे झाल्याचे सांगण्यात येत आहे. मायकेल गॅम्बॉन यांनी हॅरी पॉटर च्या आठ सीरीजपैकी सहा सीरीजमध्ये काम केले होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतर त्यांची वयाच्या ८२ व्या वर्षी प्राणज्योत मालवली.
मायकेल गॅम्बॉन यांच्या निधनानंतर हॉलिवूडवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या निधनानंतर हॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी पोस्ट शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली.