१० मे पासून या पाच राशींचे दिवस पालटणार; जाणून घ्या सविस्तर

पुणे : जेव्हा एखादा ग्रह आपली स्थिती बदलतो त्याचा परिणाम १२ राशींवर दिसून येतो. १० मे २०२३ बुधवारी बुध ग्रह उदयस्थितीत येणार आहे. त्यामुळे काही राशींचं भाग्योदय उजळणार आहे. बुध १० मे २०२३ ला मेष राशीत गोचर करणार आहे. चला मग बुधदेवाताची तुमच्या राशीवर कृपा होणार का जाणून घ्या.

मेष
मेष राशीच्या लोकांसाठी बुध उदय भाग्यशाली ठरणार आहे. प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळणार आहे. व्यक्तिमत्त्वात एक वेगळीच चमक दिसणार आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण असणार आहे. व्यावसायिकांना धनलाभ होणार असून हा काळ अतिशय लाभदायक ठरणार आहे.

मिथुन
मिथुन राशीच्या लोकांना बुधाचा उदय अतिशय फायदेशीर ठरणार आहे. अनेक दिवासांपासून रखडलेली काम मार्गी लागणार आहे. व्यवसायिकांना या काळात धनलाभ होणार आहे. नवीन करार होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात आनंदच आनंद असणार आहे. इच्छुकांचे लग्न ठरणार आहेत.

सिंह
सिंह राशीच्या लोकांसाठी बुधाचा उदय प्रगती आणि आर्थिक लाभ घेऊन येणार आहे. हा काळ त्यांचासाठी भाग्यशाली ठरणार आहे. तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहे. वरिष्ठ्यांचा मदतीने नवीन कामास सुरुवात करणार आहात. धार्मिक कार्यात मन रमणार आहे.

कुंभ
कुंभ राशीच्या लोकांना बुध उदय अतिशय फलदायी ठरणार आहे. गुंतवणूक ही तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखू शकता. प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमचा मान सन्मान वाढणार आहे.

कर्क
कर्क राशीच्या लोकांसाठी बुध उदय नशिबवान ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचं चीज होणार आहे. प्रमोशन आणि इक्रींमेंट होण्याची दाट शक्यता आहे. व्यावसायिकांची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. रखडलेली कामं सुरळीत पूर्ण होणार आहे. परदेशवारीचे योग आहेत.