तरुण भारत लाईव्ह । १६ ऑक्टोबर २०२३। गणेशउत्सवानंतर दहा रुपये किलोंवर आलेले झेंडूच्या फुलाचे दर दुर्गामातेचे आगमन होताच पुन्हा वधारले आहेत. नवरात्र उत्सवाच्या पहिल्या माळेला झेंडूच्या फुलांचे दर ७० ते ८० रुपये किलोंपर्यंत वाढले आहेत. तसेच पुढच्या दहा दिवसात दसऱ्यापर्यंत झेंडूचे दर १०० रुपये किलोच्या वर जातील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
गणेशोत्सव नवरात्र उत्सवाच्या काळात फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत असते यंदाच्या गणेशोत्सव काळात फुलांचे दर शंभर ते दोनशे रुपयांपर्यंत गेले होते मात्र त्यानंतर पितृपक्ष सुरू झाल्यानंतर फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात कमी झाली त्यामुळे फुलांचे दर पाच ते दहा रुपये किलो पर्यंत खाली आले होते मात्र आता घटस्थापनेच्या पार्श्वभूमीवर फुलांच्या दरात मोठी वाढ झाली गुरुवार शुक्रवार पर्यंत फुलांचे दर १० ते १५ रुपयांपर्यंत होते तर शनिवारी हेच दर ४० ते ५० रुपये किलो वरती आले तर रविवारी ७० ते ८० रुपयांपर्यंत हे दर वाढले होते. दरम्यान नवरात्र उत्सवाच्या प्रत्येक दिवशी फुलांची आवश्यकता असते. त्यामुळे फुलांचे दर वाढणार आहे तर दसऱ्याच्या दिवशी फुलांना मोठी मागणी असते त्यामुळे दर वाढू शकतात.