तरुण भारत लाईव्ह । २५ सप्टेंबर २०२३। सप्टेंबर महिना संपण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. पैशांची संबंधित नियम १ ऑक्टोंबर पासून बदलणार आहे. याचा थेट परिणाम सर्व सामान्यांच्या खिशावर होणार आहे. तुमच्यासाठी या नियमांची माहिती असणे महत्त्वाचे आहे असे न झाल्यास तुम्हाला समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
रिझर्व्ह बँकेने सप्टेंबर २०२३ पर्यंत २००० रुपयांची नोट बदलण्याची मुदत दिली आहे. त्यानंतर या नोटा चालणार नाही त्यामुळे दोन हजार रुपयांची नोट नक्कीच बदलून घ्या. सेबीने डिमॅट आणि ट्रेडिंग खात्यांमध्ये नॉमिनेशन अनिवार्य केले आहे त्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर २०२३ रोजी संपेल या तारखेपर्यंत कोणत्याही खातेदाराने नॉमिनेशन केले नाही तर ते खाते एक ऑक्टोंबर पासून गोठवले जाईल.
अशा परिस्थितीत तुम्ही डिमॅट आणि ट्रेडिंग करू शकणार नाही आता छोट्या बचत योजनांमध्ये आधार अनिवार्य करण्यात आले आहे पीपीएफ सुकन्या समृद्धी पोस्ट ऑफिस स्कीम इत्यादींमध्ये आधारची माहिती देणे आवश्यक आहे. असे न केल्यास १ ऑक्टोंबर २०२३ पासून ही खाती गोठवली जातील. एलपीजीच्या किमती कमी होऊ शकतात.
पाच राज्यांतील निवडणुका हे त्यामागचे कारण असल्याचे बोलले जात आहे. मात्र, पेट्रोलियम कंपन्यांनी गेल्या महिन्यातच थेट एलपीजीच्या किमती 200 रुपयांनी कमी केल्या होत्या. मात्र, यावेळी केवळ व्यावसायिक सिलिंडरच्या किमती कमी होऊ शकतात, असेही सांगण्यात येत आहे. एवढेच नाही तर १ ऑक्टोबरला पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी कपात होणार असल्याचा दावाही सूत्रांनी केला आहे. कारण कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने घट नोंदवली जात आहे. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्या किमती कमी करण्याचा विचार करतील अशी अपेक्षा आहे.