१ ऑक्टोबर रोजी राज्यभर स्वच्छता मोहिम राबवण्याचे मुख्यमंत्री शिंदे यांचे आवाहन

तरुण भारत लाईव्ह । ३० सप्टेंबर २०२३। स्वच्छता ही सेवा या अभियाना अंतर्गत राज्यभर स्वच्छता मोहिम राबवण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. येत्या २ ऑक्टोबर ला महात्मा गांधी जयंती आहे.  महात्मा गांधी जयंतीच्या एक दिवस आधी हि मोहीम राज्यात राबविण्यात येणार आहे. राज्यात सगळीकडे एक तारीख – एक तास ही मोहीम राबवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

राज्यभरातील खेड्यापाड्यांपासून ते शहरांपर्यंत सकाळी वाजल्यापासून या मोहीमेची सुरुवात करण्यात करण्यात येणार आहे. या उपक्रमा अंतर्गत प्रत्येकजण जिथे कुठे असेल तिथे स्वच्छता किंवा साफसफाई करुन या अभियानामध्ये सहभागी होऊ शकणार आहेत. स्वच्छता आपल्या सर्वाच्या दैनंदिनीतील महत्वाची गोष्ट आहे.  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यापासून ते अनेक थोर राष्ट्र पुरूष संतानीही स्वच्छतेबाबत आपल्याला धडे शिकवले आहेत. याच अनुषंगाने  ‘स्वच्छता पंधरवडा-स्वच्छता ही सेवा’ हे अभियान यशस्वी करायचं आहे. ‘एक तारीख एक तास’ या उपक्रमाला स्वच्छता लोकचळवळीचे रूप द्यायचे आहे. त्यासाठी प्रत्येकाला आपला एक तास तास स्वच्छतेसाठी द्यायचा आहे.

मुख्यमंत्री “एकनाथ शिंदे” यांनी म्हटलं की, ‘ महाराष्ट्रातील परिसर स्वच्छ करण्यासाठी अनेक थोरा- मोठ्यांनी चांगल्या सवयीचा मंत्र दिला आहे. तर संत गाडगेबाबांनी देखील हातात झाडू घेऊन स्वच्छतेचे धडे दिलेत.  आता या धड्यांची आपल्याला उजळणी करायची आहे. आपआपल्या परिसरात महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत तसेच गावा-गावांमध्ये ग्रामपंचायतींच्या पुढाकारांनी स्वच्छता मोहिम राबवायची आहे. साचलेला कचरा, राडा-रोडा-डेब्रीज हटवायचे आहेत. यात आपल्या सर्वांच्या मदतीसाठी स्थानिक स्वराज्य संस्था, महसूल आणि जिल्हा प्रशासन सज्ज राहील.