तरुण भारत लाईव्ह । १३ ऑक्टोबर २०२३। इस्त्राईलमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षितपणे भारतात आणण्यासाठी ऑपरेशन अजय राबवले जाणार आहे अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अजय बाक्षी यांनी दिली. जवळपास १८ हजार भारतीयांचे सुटका इस्राईलमधून केली जाईल. २३० भारतीयांना घेऊन पहिले विमान बेन गुरुयन विमानतळावरून गुरुवारी रात्री नऊ वाजता भारताच्या दिशेने झपावले.
परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जय शंकर यांनी एक्स वर पोस्ट शेअर करत ऑपरेशन अजय बाबत माहिती दिली. इस्त्राईल मधून परतण्याची इच्छा असलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी ऑपरेशन अजय सुरू केले जाणार आहे. विशेष विमानांची तसेच इतर व्यवस्था केली जाईल. भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी सरकार कटिबद्ध आहे अशी माहिती जयशंकर यांनी दिली होती.
पहिल्या विमानातून जाणाऱ्या भारतीयांच्या यादीचा मेल आम्ही पाठवला आहे पुढील उड्डाणांबाबत लवकरच माहिती दिली जाईल. इस्त्राईलमध्ये जवळपास १८ हजार भारतीय आहेत असे जयशंकर यांच्या घोषणेनंतर इस्त्राईलमधील भारतीय दूतावासाने स्पष्ट केले. इस्त्राईलमधील परिस्थितीवर नजर ठेवण्यासाठी आम्ही नियंत्रण कक्ष स्थापन केला असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिली. इस्त्राईलमध्ये भारतीय नागरिकांनी सावधगिरी बाळगावी अशी सूचना भारतातील दुतावासाने दिली आहे.
इस्त्राईलमध्ये सध्या स्थिती पाहता नागरिकांनी सतर्क रहावे तसेच स्थानिक अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करावे असे दुतावासाने नागरिकांना सांगितले आहे. भारतीयांसाठी आकर्षक देश आहे तिथे त्यांना चांगल्या वेतनाशिवाय मोफत बहुजन निवास आणि आरोग्य सुविधा मिळतात जवळपास हजार भारतीय विद्यार्थी तेथे शिक्षण घेत आहेत मध्ये भारतीय वंशांच्या जवळपास ८५ हजार यहुदींचे वास्तव्य आहे.