२३ ऑगस्ट हा दिवस ‘राष्ट्रीय अंतराळ दिवस’ साजरा केला जाईल; मोदींची घोषणा

तरुण भारत लाईव्ह । २६ ऑगस्ट २०२३। पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगरूळमधील इस्रोच्या चांद्रयान कमांड नेटवर्क मिशन कंट्रोल कॉम्प्लेक्समध्ये पोहोचले. चांद्रयान ३ या मोहिमेत सहभागी शास्त्रन्यांचे अभिनंदन केले. त्यांचं मन आनंदानी भरून गेलं असल्याच मोदींनी सांगितलं. यावेळी आजपासून दरवर्षी २३ ऑगस्ट हा दिवस ‘ राष्ट्रीय अंतराळ दिवस’ म्हणून साजरा केला जाईल. अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

हा प्रवास सोप्पा नव्हता. तुम्ही केलेल्या कामाची माहिती हि देशवासियांना मिळाली पाहिजे. मून लँडरचं सॉफ्ट लँडिंग सुनिश्चित करण्यासाठी, शास्त्रन्यांनी आर्टीफिशिअल बनवलं. विक्रम लॅडर उतरवून त्याची चाचणी घेतली गेली. एवढ्या परीक्षा देऊन मून लॅडर तिथे पोहोचलं. त्यामुळे त्याला यश मिळणार हे निश्चित होत. भारतातील तरुण पिढी सायन्स, अंतराळ व इनोव्हेशन या संदर्भात जाणून  घेण्यासाठी उत्सुक आहे.

मंगळयान आणि चांद्रयानचं यश यामुळे देशाला एक नवं चैतन्य दिल आहे. आज भारतातील प्रत्येक नागरिकांच्या तोंडी चांद्रयानचं नाव आहे. तुम्ही तुमच्या यशाची खोल छाप सोडली आहे. तरुण पिढीला नेहमी प्रेरणा मिळावी, म्हणून २३ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अवकाश दिवस म्हणून साजरा केला जाईल. आणि हा दिवस आपल्याला नेहमी प्रेरणा  देत राहील.