२ बायका, ६ मैत्रिणी आणि ९ मुलांच्या निर्वाहासाठी ‘तो’ करायचा हे काम; पोलिसांनी घातल्या बेड्या

खोट्या नोटा देऊन लोकांचे पैसे लुटणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आपल्या २ बायका, ६ मैत्रिणी आणि ९ मुलांसाठी त्याने ही फसवणूक केल्याचे आरोपीने सांगितले. अजित मौर्य (४१) असे या आरोपीचे नाव आहे. २७ नोव्हेंबर रोजी धर्मेंद्र कुमार यांच्या तक्रारीवरून पोलिसांना अजित मौर्यच्या गैरकृत्याची माहिती मिळाली. अजित मौर्य उर्फ ​​रमेश याने पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून ३ लाखांची फसवणूक केली आहे.
अजित आपल्या काही साथीदारांसोबत हे काम करायचा. चौकशी दरम्यान त्याने सांगितले की, फोनकरुन तो व त्याचे साथीदार पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवत. त्यांच्यावर बनावट योजना, नकली पैसे चालवणे, लोकांना विमा योजनांमध्ये अडकवणे, असे अनेक आरोप आहेत. जसजसे अधिक लोक स्कीममध्ये सामील होतील, तसतसे पैसे दुप्पट होत जातील. मात्र पिडीतांना फसवणूक झाल्याचे समजले आणि त्यांनी अजित मौर्य यांच्याविरोधात यूपी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी अजित मौर्य याला बुधवारी (२९ नोव्हेंबर) लखनऊच्या सरोजिनी नगर येथील एक हॉटेलमधून अटक केली. तो आपल्या पत्नीसोबत परदेशात जाण्याच्या तयारीत होता.
सुरूवातीस, तो मुंबईत प्लास्टर ऑफ पॅरिस सिलिंग बनवण्याचे काम करायचा. काम मिळणे बंद झाल्यानंतर त्याने गुन्हेगारीचा मार्ग अवलंबला. २००० मध्ये त्याने मुंबईतील ४० वर्षीय संगीतासोबत लग्न केले आणि त्यानंतर तिला सात मुले झाली. २०१० मध्ये त्याची नोकरी गेली आणि त्यानंतर अजित मौर्य गोंडा येथील त्यांच्या गावी परतला, परंतु त्याला कोणतीही नोकरी मिळाली नाही. दोन वर्षानंतर तो ३० वर्षीय सुशीलाच्या संपर्कात आला. यानंतर उदरनिर्वाहासाठी त्याने बनावट नोटा चलनात आणण्यास सुरुवात केली. यानंतर त्याने २०१९ मध्ये सुशीलाशी लग्न केले, जिच्यापासून त्याला दोन मुले झाली.
पोलिसांना तपासात समजले की, अजित मौर्यने दोन घरे बांधली आहेत. एका घरात संगीता आणि तिची मुले राहतात तर दुसऱ्या घरात सुशीला आणि तिची मुले राहतात. गुन्हेगारीतून मिळालेले सर्व पैसे दोघींमध्ये समान वाटत होता. मात्र तो स्वत: भाड्याच्या घरात राहायचा. पोलिसांनी अजित मौर्यचे कॉल डिटेल्सचे तपासले असता, त्याच्या आयुष्यात आणखी सहा प्रेमिका असल्याचे उघड झाले.