सोलापूर : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आज आपल्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांसह सोलापुरात येणार आहेत. ते उद्या पंढरपूरला जाऊन विठ्ठालाचं दर्शन घेणार आहेत. या निमित्तानं बीआरएस पक्ष महाराष्ट्रात जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहे. के. चंद्रशेखर राव हे आज तीनशे गाड्यांच्या ताफ्यासह सोलापूरला येणार आहेत. हेलिकॅप्टरच्या माध्यमातून विठ्ठल मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे.
बीआरएस पक्षाला आता महाराष्ट्रात आपला विस्तार करायचा आहे. याच पार्श्वभूमीवर नांदेड, छत्रपती संभाजीनगर यानंतर आता तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आपलं लक्ष सोलापूर जिल्ह्यावर केंद्रित केलं आहे. के. चंद्रशेखर राव हे आजपासून दोन दिवसीय सोलापूर जिल्ह्याच्या दौर्यावर येत आहेत. मात्र त्यांच्या दौर्यामध्ये बदल करण्यात आला असून, ते हेलिकॉप्टर ऐवजी ते आता कारने सोलापूरमध्ये येणार आहेत. केसीआर यांच्यासोबत तीनशे गाड्यांचा ताफा असणार आहे.
बिआरएसकडून आषाढी वारीचा मुहूर्त साधत पंढरपुरात जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे आपल्या कॅबिनेट मंत्रिमंडळासह पांडुरंगाचे दर्शन घेणार आहेत. विठ्ठलाच्या मंदिरावर हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पुष्पृष्टी करण्यात येणार आहे. सरकोली येथे बीआरएस पक्षाचा शेतकरी मेळावा होणार आहे.