Bus Accident । ४० विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या हिरकणी बसचा भीषण अपघात

राज्य परिवहन महामंडळाच्या अनेक बसची दयनीय अवस्था झाली असून बसेसला होणाऱ्या अपघाताच्या घटना देखील वाढताना दिसत आहे. यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घालून प्रवास करावा लागतोय. आता अशातच ४० विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या हिरकणी बसचा अपघात झाला. या अपघातात सर्व विद्यार्थी जखमी झाले असून त्यांना लागलीच उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

नेमकी घटना काय?
पालघर जिल्ह्यातील वाडा आगाराची हिरकणी बस वाडा बसस्थानकातून आज सकाळी विद्यार्थ्यांना घेऊन मार्गस्थ झाली. बस वाड्याहून आमगावच्या दिशेने जात असताना कुमदल गावा जवळील असलेला चढाव चढत असताना बस असताना बंद पडली व मागे येऊ लागली. यावेळी बस चालकाने ब्रेक दाबला असताना ब्रेक फेल झाले होते. यामुळे बस मागे उताराला आल्याने पलटी झाली. या बसमध्ये एकूण ४० विद्यार्थी प्रवास करत होते. हे सर्व विद्यार्थी जखमी झाले आहे.

सर्व जखमी विद्यार्थ्यांवर वाडा येथील रूग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेनंतर पालक वर्गातून संताप व्यक्त केला जात असून भंगार बस असून यामधून विद्यार्थी प्रवास करतात. महामंडळने चांगल्या दर्जाचे बस उपलब्ध करून द्यावे. तसेच बस डेपोतून निघताना बस पुर्णपणे तपासली जाते. मग बसचा ब्रेक फेल झाला कसा? असा संतप्त सवाल पालक करत आहेत.