सातार लोकसभा निवडणुकीसाठी भाजप उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कराडमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी ते म्हणाले, आयुष्मान भारत योजनेंतर्गत ७० वर्षांपुढील व्यक्तींचा उपचाराचा खर्च आम्ही करणार आहोत, अशी घोषणा पीएम मोदी केली.
ते म्हणाले की, कर्नाटकातील काँग्रेसचे मनसुबे आम्ही पाहिले आहेत. बाबासाहेब धर्माच्या नावावर आरक्षण देण्यास नकार देतात, मात्र कर्नाटक सरकारने मुस्लिमांना ओबीसी बनवून रातोरात ओबीसी समाजाचे हक्क हिरावून घेतले. काँग्रेसला हा फॉर्म्युला संपूर्ण देशात आणायचा आहे. पण मी ते होऊ देणार नाही.
खोटे व्हिडिओ शेअर करू नका
ज्यांना समोर लढता येत नाही ते खोटे व्हिडिओ पसरवत आहेत. अमित शाह यांचा एक खोटा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होता. यासंदर्भात पंतप्रधान मोदींनी वक्तव्य केलं आहे. असे खोटे व्हिडीओ कधी आले तर ते फॉरवर्ड करू नका, असेही ते म्हणाले. कारण यामुळे आमचे निष्पाप नागरिकही अडकू शकतात. असे व्हिडिओ टाळा. निवडणूक आयोगाने याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन मी करतो.