नवी दिल्ली : ॲन्ड्रॉईड स्मार्टफोन वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानी हॅकर्स ग्रुप भारतीय स्मार्टफोन युजर्सना लक्ष्य करत आहेत. यासाठी पाकिस्तान सपोर्टेड हॅकर्स ग्रुप Transparent Tribe नं धोकादायक CapraRAT व्हायरसची मदत घेतली आहे. सायबर सिक्योरिटी रिसर्च एजेंसी SentinelOne च्या अलीकडेच आलेल्या रिपोर्टनुसार, CapraRAT एक खतरनाक व्हायरस आहे, जो मोबाइल रिमोट अॅक्सेस ट्रोजन (RAT) व्हायरस आहे, ज्यामुळे पाकिस्तानच्या सीमेलगत राहणाऱ्या लोकांच्या माध्यमातून नजर ठेवली जाऊ शकते.
अलीकडेच Trend Micro च्या रिसर्च टीमनं सांगितलं आहे की CapraRAT प्रामुख्याने अँड्रॉइड सोर्स कोडवर आधारित असतो. त्यामुळे iOS म्हणजे iPhone युजर्सना ह्याचा धोका नाही. भारतात Android युजर्सची संख्यां iOS च्या तुलनेत खूप जास्त आहे. सायबर सिक्योरिटी रिसर्च टीमचे रिसर्चर अॅलेक्स डेलमोटनुसार, CapraRAT एक शक्तीशाली टूल आहे, ज्याच्या माध्यमातून Android युजर्सच्या फोनचा डेटा कंट्रोल केला जाऊ शकतो. हे टूल इतर अॅपमध्ये कोडिंगच्या माध्यमातून RAT लपवू शकतो, त्यामुळे जास्त धोकादायक आहे. त्यामुळे युजर्सना हा व्हायरस लपल्याची खबर देखील लागत नाही.
रिपोर्टनुसार, पाकिस्तानी हॅकर्स ग्रुप Transparent Tribe नं हा व्हायरस Google Play Store च्या माध्यमातून युजर्सच्या स्मार्टफोनमध्ये इंजेक्ट करण्यास सुरुवात केली आहे. इतकंच नव्हे तर हॅकर्सनं गुगल प्ले स्टोर व्यतिरिक्त सोशल प्लॅटफॉर्म्स, सोशल चॅनेल्स, सेल्फ रन वेबसाइट इत्यादींच्या माध्यमातून देखील ह्याचा प्रसार सुरु केला आहे. युजर्सना हॅकर्स अॅप्सच्या एपिके फाईल्सची लिंक देखील पाठवत आहेत, त्यामुळे व्हायरस इंफेक्टेड हे अॅप्स युजरच्या फोनमध्ये इंस्टॉल होतात. ह्यासाठी हॅकर्स लोकप्रिय फिशिंग टेक्नॉलॉजीचा वापर करत आहेत, ज्यात युजर्सना आकर्षित करण्यासाठी ऑफर्सच्या माध्यमातून फसवलं जातं.
अशी घ्या काळजी
धोकादायक व्हायरसपासून बचाव करण्यासाठी अनोळखी नंबरवरून येणारे कॉल्स, मेसेज इत्यादींकडे दुर्लक्ष करा. तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मिळणाऱ्या ऑफर इत्यादींच्या जाळ्यात अडकू नका आणि तुमच्या फोनमध्ये फक्त वेरिफाइड अॅप्सच डाउनलोड करा. फोनमध्ये अॅप इंस्टॉल करण्यासाठी फक्त Google Play Store चा वापर करा. फोनच्या सेटिंग्समध्ये जाऊन ‘Install From Unknown Sources’ वॉल ऑप्शन चुकूनही ऑन करू नका.