1 जुलैपासून Citroen च्या ‘या’ कारची किंमत वाढवणार ; जाणून घ्या कितीने महागणार?

नवी दिल्ली । जर तुम्ही पुढील महिन्यात Citroen C3 खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला त्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतील. फ्रेंच कंपनी Citroen ने अलीकडेच आपल्या हॅचबॅक C3 च्या किमती वाढवणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र, आता वाढीव किमती 1 जुलै 2023 पासून लागू होणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. नवीन किमती 1 जुलै रोजी आणि त्यानंतर बुक केलेल्या कारसाठी लागू होतील.

ही कार लाँच झाल्यापासून चौथ्यांदा या कारच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. ही कार गेल्या वर्षी भारतीय बाजारात लॉन्च झाली होती. तेव्हापासून कारच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे.

कंपनीने या कारची किंमत 17500 रुपयांनी वाढवली आहे. या नवीन किमती 1 जुलैपासून लागू होतील. जर तुमचाही ही कार खरेदी करण्याचा विचार असाल तर या महिन्यात खरेदी करा.

कंपनीने ही कार भारतीय बाजारपेठेत 3 ट्रिममध्ये सादर केली. यामध्ये लाइव्ह, फील आणि शाइन सारख्या प्रकारांचा समावेश आहे. या तीनपैकी, Live हा सर्वात परवडणारा प्रकार आहे, जो भारतीय बाजारपेठेत सर्वाधिक विकला जातो. लाइव्ह व्हेरियंटची किंमत 6.16 लाख रुपये, फील व्हेरिएंटची किंमत 7.08 लाख रुपये आणि शाइन व्हेरिएंटची किंमत 8.25 लाख रुपये आहे. मात्र, दरवाढ होण्यापूर्वीचे हे दर आहेत.

हे इंजिन Citroen C3 मध्ये उपलब्ध 
कंपनीने ही कार 2 पेट्रोल इंजिन व्हेरियंटसह लॉन्च केली आहे. या कारमध्ये 1.2 लीटर पेट्रोल इंजिन आहे, जे 81 bhp ची कमाल पॉवर आणि 115 nm टॉर्क जनरेट करते. याशिवाय कारमध्ये 1.2-लिटर टर्बोचार्ज्ड इंजिन दिले आहे, जे 109 bhp पॉवर आणि 190 nm टॉर्क जनरेट करते. कारमध्ये 5-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आला आहे.