ऑगस्ट महिना संपला आता अवघे तीन दिवस उरले असून यांनतर सप्टेंबर महिन्याला सुरुवात होईल. अशा परिस्थितीत सप्टेंबर महिन्यापासून असे काही खास बदल होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल. या बदलांमध्ये एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीपासून ते क्रेडिट कार्डच्या नियमांपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आहे. सप्टेंबर महिन्यात कोणते बदल होऊ शकतात आणि त्याचा तुमच्या खिशावर किती परिणाम होईल? ते जाणून घ्या..
एलपीजी सिलिंडरच्या किमती
सरकार दर महिन्याच्या १ तारखेला एलपीजीच्या किमतीत बदल करत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडर आणि एलपीजीच्या किमतींमध्ये बदल दिसत आहेत. अशा परिस्थितीत यावेळीही एलपीजी सिलिंडरच्या दरात बदल अपेक्षित आहे. गेल्या महिन्यात व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत 8.50 रुपयांनी वाढली होती, तर जुलैमध्ये त्याची किंमत 30 रुपयांनी कमी झाली होती.
ATF आणि CNG-PNG दर
एलपीजी सिलिंडरच्या किमतींसोबतच, तेल बाजारातील कंपन्या हवाई इंधन म्हणजेच एअर टर्बाइन इंधन (एटीएफ) आणि सीएनजी-पीएनजीच्या किमतीही सुधारतात. या कारणास्तव, त्यांच्या किंमतींमध्ये बदल पहिल्या तारखेला दिसू शकतात.
हे ॲप्स Google Play Store वरून काढून टाकले जातील
Googleचे नवीन Play Store धोरण 1 सप्टेंबर 2024 पासून लागू केले जात आहे. गुगलचे म्हणणे आहे की, 1 सप्टेंबरपासून Google अशा हजारो ॲप्स आपल्या Play Store वरून काढून टाकणार आहे, जे Google Play Store वर कमी दर्जाचे ॲप्स आहेत.
मेसेज आणि ओटीपी मिळण्यास विलंब
ट्रायने 1 सप्टेंबरपासून फेक कॉल्स आणि मेसेजला आळा घालण्याच्या सूचना दिल्या आहेत. या अंतर्गत Airtel, Vodafone-Idea, Jio आणि BSNL सारख्या दूरसंचार कंपन्यांना नोंदणी नसलेले मेसेज आणि कॉल्स ओळखून ब्लॉक करावे लागतील. त्यासाठी 30 सप्टेंबर 2024 ही मुदत देण्यात आली आहे. काही मोबाइल वापरकर्त्यांना 1 सप्टेंबरपासून बँकिंग कॉल, संदेश आणि OTP प्राप्त होण्यास विलंब होऊ शकतो. जर तुम्ही ऑनलाइन बँकिंग किंवा ओटीपी आधारित पेमेंट किंवा डिलिव्हरी करत असाल तर ओटीपी मिळण्यास विलंब होऊ शकतो, अशा स्थितीत तुम्हाला ऑनलाइन पेमेंट, ऑनलाइन शॉपिंग यासारख्या कामांमध्ये अडचणी येऊ शकतात.
रुपे कार्ड रिवॉर्ड पॉइंट
NPCI च्या नवीन नियमांनुसार, आता RuPay क्रेडिट कार्ड आणि UPI व्यवहार शुल्क तुमच्या RuPay रिवॉर्ड पॉइंट्समधून कापले जाणार नाहीत. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने याप्रकरणी सर्व बँकांना कळवले आहे. NPCI चा हा नवीन नियम 1 सप्टेंबर 2024 पासून देशभरात लागू होणार आहे.
क्रेडिट कार्ड संबंधित नियम
1 सप्टेंबरपासून, HDFC बँक युटिलिटी व्यवहारांवर रिवॉर्ड पॉइंट्सची मर्यादा निश्चित करणार आहे, ज्या अंतर्गत ग्राहकांना या व्यवहारांवर दरमहा केवळ 2,000 पॉइंट्स मिळू शकतात. थर्ड पार्टी ॲपद्वारे शैक्षणिक पेमेंट केल्यास HDFC बँक कोणतेही बक्षीस देणार नाही.
IDFC फर्स्ट बँक सप्टेंबर 2024 पासून क्रेडिट कार्डवर देय असलेली किमान रक्कम कमी करेल. पेमेंटची तारीख देखील 18 वरून 15 दिवसांपर्यंत कमी केली जाईल. याशिवाय, एक बदल आहे – 1 सप्टेंबर, 2024 पासून, UPI आणि इतर प्लॅटफॉर्मवर पेमेंटसाठी RuPay क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना इतर पेमेंट सेवा प्रदात्यांचे क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांप्रमाणेच रिवॉर्ड पॉइंट्स मिळतील.
मोफत आधार कार्ड अपडेट
आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची शेवटची तारीख १४ सप्टेंबर निश्चित करण्यात आली आहे. यानंतर तुम्ही आधारशी संबंधित काही गोष्टी मोफत अपडेट करू शकणार नाही. 14 सप्टेंबरनंतर आधार अपडेट करण्यासाठी शुल्क भरावे लागणार आहे. तथापि, यापूर्वी मोफत आधार अपडेटची अंतिम तारीख 14 जून 2024 होती, ती 14 सप्टेंबर 2024 पर्यंत वाढवण्यात आली होती.
महागाई भत्ता
केंद्र सरकार सप्टेंबरमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. सरकार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ करेल अशी अपेक्षा आहे. सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना 50 टक्के महागाई भत्ता (DA) दिला जात आहे, तर 3 टक्क्यांनी वाढल्यानंतर तो 53 टक्के होईल.