नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे.विशेष म्हणजे थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO)ने भरतीची अधिसूचना काढली आहे. या भरती प्रक्रियेतून तब्बल 90 जागा या भरल्या जाणार आहेत. विविध ट्रेडसाठी या जागा भरल्या जातील. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे.
या भरती प्रक्रियेसाठी तुम्ही ऑफलाइन पद्धतीने देखील अर्ज ही करू शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 7 मार्च 2024 आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.
रिक्त जागा तपशील
पदवीधर प्रशिक्षणार्थी: 15 पदे
तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ उमेदवार: 10 पदे
ट्रेड (ITI) शिकाऊ उमेदवार: 65 पदे
अर्जासाठी आवश्यक पात्रता
पदवीधर शिकाऊ पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित विषयातील पदवी असणे आवश्यक आहे. तर, तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ पदांसाठी अर्ज करणाऱ्यांकडे संबंधित विषयात डिप्लोमा असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, ट्रेड (ITI) शिकाऊ उमेदवारांसाठी संबंधित ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
पगार
पदवीधर प्रशिक्षणार्थी: रु. 9000
तंत्रज्ञ शिकाऊ: रु 8000
ट्रेड अप्रेंटिस: रु 7000
या पत्त्यावर अर्ज पाठवा
Advanced Systems Laboratory (ASL) कांचनबाग, PO, हैदराबाद-500058
जाहिरात पहा : PDF