रेल्वेत नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुण-तरुणींसाठी एक मोठी संधी चालून आली आहे. रेल्वे भर्ती बोर्डाने RRB ‘टेक्निशियन’ पदांसाठी भरती जाहीर केली आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया मार्च किंवा एप्रिल महिन्यापासून सुरु होईल. या भरती मोहिमेद्वारे अंदाजे 9000 पदे भरली जातील.
अर्ज करण्यासाठी उमेदवाराने भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट (Website) indianrailways.gov.in वर जाऊन अर्ज भरावा लागेल.
ही पात्रता आवश्यक
या भरतीसाठी उमेदवाराचे शिक्षण १० वी उत्तीर्ण असायला हवे. तसेच उमेदवराने ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
निवड प्रक्रिया कशी असेल?
या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराला कम्प्युटर बेस आधारित चाचणी द्यावी लागेल. उमेदवाराला CBT1 मध्ये उत्तीर्ण झालेल्या CBT2 परीक्षेत सहभागी होता येईल. CBT2 मध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणीसाठी बोलावले जाईल. सर्व टप्प्यांत यशस्वी झाल्यानंतर उमेदवारांना गुणवत्ता यादीत स्थान मिळेल.
अर्ज शुल्क
या भरती मोहिमेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.
अर्ज करणाऱ्या सामान्य आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना ५०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.
अर्ज करणाऱ्या SC, ST, माजी सैनिक, PWBD, महिला आणि तृतीय श्रेणीतील उमेदवारांना फक्त २५० रुपये शुल्क भरावे लागेल