10वी ते पदवीधरांना महाराष्ट्र शासनाच्या नोकरीची सुवर्ण संधी.. तब्बल ‘इतक्या’ जागांवर निघाली भरती

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी खुशखबर आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेला सुरुवात झालीय. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालवता या भरतीसाठी अर्ज करावा.

ही भरती प्रक्रिया महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात राबविली जात आहे. दहावी ते पदवीधरांना सरकारी नोकरी मिळविण्याची ही उत्तम संधी आहे. या भरतीद्वारे विविध रिक्त पदाच्या 289 जागा भरल्या जाणार आहेत. ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचा आहे त्यांना संबंधित संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 ऑगस्ट 2024

ही पदे भरली जाणार?
1) रचना सहायक (गट ब) 261
2) उच्चश्रेणी लघुलेखक (गट ब) 09
3) निम्न श्रेणी लघुलेखक (गट ब) 19

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: स्थापत्य किंवा ग्रामीण आणि स्थापत्य/नागरी व ग्रामीण किंवा वास्तुशास्त्र किंवा बांधकाम तंत्रज्ञान डिप्लोमा
पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण उत्तीर्ण (ii) लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण उत्तीर्ण (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.

इतका पगार मिळेल :
रचना सहायक (गट ब) – 38,600/- ते 1,22,800/-
उच्चश्रेणी लघुलेखक (गट ब) – 41,800/- ते 1,32,300/-
निम्न श्रेणी लघुलेखक (गट ब) – 38,600/- ते 1,22,800/-

वयाची अट : 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट]
अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹900/-]
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा