१०वी ते पदवी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी चालून आली आहे. आयकर विभागांतर्गत कर सहाय्यक, हवालदार या पदांसाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीसाठी उमेदवारांना त्यांचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने करता येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२३ आहे.
पदाचे नाव – कर सहाय्यक, हवालदार
भरतीसाठी पात्रता –
कर सहाय्यक – मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समकक्ष.
हवालदार – मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी पास किंवा समकक्ष.
वयोमर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते २७ वर्षापर्यंत असावे.
इतका पगार मिळेल:
कर सहाय्यक – २५ हजार ५०० रुपये ते ८१ हजार १०० रुपये महिना.
हवालदार – १८ हजार ते ५६ हजार ९०० रुपये महिना.
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता – कस्टम्स, कार्मिक आणि आस्थापना विभागाचे सहाय्यक/ उपायुक्त, 8वा मजला, नवीन कस्टम हाउस, बॅलार्ड इस्टेट, मुंबई – ४००००१
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० नोव्हेंबर २०२३
अधिकृत वेबसाईट – incometaxmumbai.gov.in
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा