10वी पाससाठी केंद्र शासनाच्या नोकरीची संधी; येथे निघाली जम्बो भरती

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर आहे. भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय अंतर्गत ASC दक्षिण सेंटर 2ATC मध्ये विविध पदांकरीता भरती निघाली आहे. दहावी पास उमेदवारांसाठी ही मोठी संधीच म्हणावी लागेल. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 02 फेब्रुवारी 2024 आहे.

या पदांसाठी होणार भरती
1) कुक 03
2) सिव्हिलियन कॅटरिंग इन्स्ट्रक्टर 03
3) MTS (चौकीदार) 02
4) ट्रेड्समन मेट 08
5) व्हेईकल मेकॅनिक 01
6) सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर 09
7) क्लिनर (सफाईकर्मी) 04
8) लिडिंग फायरमन 01
9) फायरमन 30
10) फायर इंजिन ड्राइव्हर 10

आवश्यक पात्रता:
पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान
पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) कॅटरिंग प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा (iii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.3: 10वी उत्तीर्ण
पद क्र.4: 10वी उत्तीर्ण
पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड & हलके वाहन चालक परवाना (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.7: 10वी उत्तीर्ण
पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अग्निशामक, नळी फिटिंग्ज आणि अग्निशामक उपकरणे आणि उपकरणे अग्निशामक इंजिन, ट्रेलर, पंप, फोम शाखा वापर आणि देखभाल करता येणे आवश्यक आहे
पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अग्निशामक, नळी फिटिंग्ज आणि अग्निशामक उपकरणे आणि उपकरणे अग्निशामक इंजिन, ट्रेलर, पंप, फोम शाखा वापर आणि देखभाल करता येणे आवश्यक आहे
पद क्र.10: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालविण्याचा 03 वर्ष अनुभव

अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Presiding Officer, Civilian Direct Recruitment Board, CHQ, ASC Centre (South)-2 ATC, Agram Post, Bangalore-07

पगार : 18000/- ते 21,700/-

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख: 02 फेब्रुवारी 2024

जाहिरात (Notification): पाहा

अर्ज (Application Form): पाहा