10वी पास उमेदवारांसाठी खुशखबर आहे. मुंबई कस्टम्स अंतर्गत भरती निघाली आहे. या भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ‘कर्मचारी कार चालक’ पदांसाठी ही भरती होणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून २० फेब्रुवारी २०२४ च्या संध्याकाळी ६ वाजेपर्यंत खाली दिलेल्या पत्त्यावर आपण अर्ज दाखल करणे आवश्यक असेल.
या भरतीद्वारे एकूण २८ रिक्त जागा भरल्या जाणार आहे. अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.
भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून २० फेब्रुवारी २०२४ च्या संध्याकाळी ६ वाजेपर्यंत खाली दिलेल्या पत्त्यावर आपण अर्ज दाखल करणे आवश्यक असेल. या पदासाठी किमान १० वी उत्तीर्ण उमेदवारांना अर्ज करता येणार आहे व कामाचे ठिकाण हे मुंबईतच असेल. १८ ते २७ या वयोगटातील उमेदवारांना निवडीसाठी प्राधान्य दिले जाणार असल्याचे सुद्धा समजतेय. मुंबई कस्टम्सतर्फे जाहीर करण्यात आलेल्या पत्रकात याविषयी दिलेली सविस्तर माहिती व मूळ जाहिरात पाहूया..
पदाचे नाव: कर्मचारी कार चालक
आवश्यक पात्रता :
01) इयत्ता 10 वी पास.
02) मोटार कारसाठी ड्रायव्हिंग परवाना ताब्यात घेणे आणि
03) मोटार कार चालविण्याचा किमान तीन वर्षांचा अनुभव
पगार : 19,000/- रुपये ते 63,200/- रुपये.
वयोमर्यादा: १८ – २७ वर्षे
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सीमाशुल्क उपायुक्त (कार्मिक व आस्थापना), कार्यालयाचे प्र. चीफ कमिशनर ऑफ कस्टम्स, न्यू कस्टम हाऊस, बॅलार्ड इस्टेट,मुंबई-400 001
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० फेब्रुवारी २०२४
अधिकृत वेबसाईट – https://www.mumbaicustomszone1.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा