10वी पाससाठी सुवर्णसंधी!! भारतीय डाक विभागामार्फत तब्बल 30,041 जागांसाठी भरती

भारतीय डाक विभागामार्फत ग्रामीण डाक सेवक- GDS पदांसाठी मेगाभरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. सुमारे 30041 जागा रिक्त आहेत. पात्र उमेदवारांनी 03 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट 2023 दरम्यान अधिकृत इंडिया पोस्ट वेबसाइट अर्थात indiapostgdsonline.gov.in द्वारे अर्ज करावा लागेल. त्यांना ऑनलाइन अर्ज भरावा लागेल आणि आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील.

पदाचे नाव :
GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)
GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)

अशी होईल निवड?

उमेदवारांची निवड ही गुणवत्तेवर आधारित असते. या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत घेतली जात नाही.  इंडिया पोस्ट 10वी गुणांच्या टक्केवारीच्या आधारावर उमेदवारांची नियुक्ती करेल.

वयाची अट : 23 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

शैक्षणिक पात्रता : 01) 10वी परीक्षा उत्तीर्ण 02) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र.

एवढा पगार मिळेल ?
या पदांसाठी निवडल्या जाणाऱ्या उमेदवारांना रु. 12,000/- ते रु. 24,470 पर्यंत पगार मिळेल

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Online अर्ज: Apply Online