10वी पास आहात का? भारतीय टपाल विभागात 40000 हून अधिक पदांची भरती

भारतीय टपाल विभागाने देशातील विविध शाखांमध्ये तब्बल 40,889 पदांची भरती जाहीर केली आहे. यासाठीची अधिसूचना नुकतीच प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. 10वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची मिळविण्याची ही सुवर्णसंधी आहे.  इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट indiapostgdsonline.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतील.  27 जानेवारीपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. उमेदवार 16 फेब्रुवारी 2023 पर्यंत अर्ज करू शकतात.

विशेष लेखी परीक्षा होणार नाही. गुणवत्तेच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाईल. 10वी मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता निश्चित केली जाईल. उमेदवाराची पात्रता जास्त असेल तर हरकत नाही. निवडीचा आधार फक्त 10वीचे गुण असतील.

या पदांसाठी होणार भरती?

ग्रामीण डाक सेवक या भरती अंतर्गत शाखा पोस्टमास्तर, सहायक शाखा पोस्टमास्तर, डाक सेवक पदे भरली जातील.

वय श्रेणी
किमान १८ वर्षे आणि कमाल ४० वर्षे.
कमाल वयोमर्यादेत अनुसूचित जातींना पाच वर्षांची, ओबीसी प्रवर्गासाठी तीन वर्षांची सूट दिली जाईल.

शैक्षणिक पात्रता
– मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळातून इयत्ता 10वी उत्तीर्ण. दहावीत गणित, स्थानिक भाषा आणि इंग्रजी विषयात उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. तसेच दहावीपर्यंत स्थानिक भाषेचा अभ्यास केलेला असणे आवश्यक आहे.

पोस्ट आणि आरक्षण
सर्वसाधारण – १८१२२ पदे
ओबीसी – ८२८५ पदे
SC- 6020 पदे
ST- 3476 पदे
EWS- 3955 पदे
PWDA – 292 पदे
PWDB – 290 पदे
PWDC – 362 पदे
PWDDE – 87 पदे

राज्यनिहाय पोस्ट तपशील –
आंध्र प्रदेश – 2480 पदे
आसाम -407 पदे
बिहार -१४६१ पदे
छत्तीसगड -१५९३ पदे
दिल्ली – 46 पदे
गुजरात -2017 पदे
हरियाणा -354 पदे
हिमाचल प्रदेश – ६०३ पदे
जम्मू/काश्मीर – 300 पदे
झारखंड -१५९० पदे
कर्नाटक -३०३६ पदे
केरळ -2462 पदे
मध्य प्रदेश -१८४१ पदे
महाराष्ट्र -2508 पदे
ओडिशा -१३८२ पदे
पंजाब -766 पदे
राजस्थान -१६८४ पदे
तामिळनाडू -3167 पदे
तेलंगणा -१२६६ पदे
उत्तर प्रदेश – ७९८७ पदे
उत्तराखंड -889 पदे
पश्चिम बंगाल – 2127 पदे

वेतनश्रेणी (पोस्टनिहाय)
– BPM साठी रु. 12,000 ते -29,380.
– GDS/ABPM साठी रु. 10,000 ते -24,470.

निवड प्रक्रिया
उमेदवारांच्या ऑनलाइन सबमिट केलेल्या अर्जांच्या आधारे, एक गुणवत्ता यादी तयार केली जाईल आणि त्यांची निवड केली जाईल.
उच्च शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे प्राधान्य मिळणार नाही. अंतिम निवड 10वी मध्ये मिळालेल्या गुणांवर आधारित असेल.

सर्वसाधारण आणि ओबीसी वर्गासाठी अर्ज शुल्क – रु. 100. एससी, एसटी आणि सर्व प्रवर्गातील महिलांसाठी कोणतेही शुल्क नाही.

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online