10वी पास आहात का? NABARD मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; वेतन 35 हजार मिळेल

राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (NABARD) मध्ये दहावी पास असलेल्या उमेदवारांना नोकरी मिळविण्याची मोठी संधी चालून आलीय. नाबार्डने ऑफिस अटेंडंट (गट ‘क’) या पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक आणि पात्र असलेले NABARD च्या अधिकृत वेबसाइट, nabard.org वर जाऊन अर्ज करू शकतात.

नाबार्डने या पदांसाठी भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीतून एकूण 108 पदे भरली जाणार आहेत. तुम्हीही नाबार्डच्या या पदांसाठी अर्ज करण्याचा विचार करत असाल, तर खाली दिलेल्या सर्व गोष्टी काळजीपूर्वक वाचा. लक्ष्यात असू द्या या भरतीसाठी अर्ज फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. २ ऑक्टोबर २०२४ पासून अर्ज स्विकारण्यास सुरूवात झाली आहे. तर २१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत तुम्ही या भरतीसाठी अप्लाय करू शकता.

अर्ज शुल्क
जे उमेदवार SC/ST/PWD/माजी सैनिक आहेत त्यांना अर्ज फी म्हणून 150 रुपये आणि इतर सर्व उमेदवारांसाठी 500 रुपये भरावे लागतील.

शैक्षणिक पात्रता: या भरतीसाठी शैक्षणिक अट फक्त १० वी पास आहे. म्हणजे साल २०२४ मध्ये तुम्ही १० वी पास केली असेल तरी देखील या पदासाठी अर्ज करू शकता आणि नोकरी मिळवू शकता.

वयोमर्यादा :
नाबार्डकडे अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय किमान १८ वर्षे आणि कमाल वय ३० वर्षे असावे. याशिवाय विविध प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयातही सवलत देण्यात आली आहे.
SC/ST: 5 वर्षे
ओबीसी : ३ वर्षे
PWD: 10-15 वर्षे (श्रेणीनुसार)
माजी सैनिक: कमाल 50 वर्षांपर्यंत सूट
विधवा/घटस्फोटित महिला: 10 वर्षे

किती पगार मिळेल: सध्या, सुरुवातीचे मासिक एकूण वेतन अंदाजे रु. 35,000/-, रु.17270-590(4)-19630-690(3)-21700-840(3)-24220-1125(2)-26470-1400(4)-32070- 1900(3)-37770 ( 20 वर्षे) गट ‘क’ मधील ऑफिस अटेंडंटना लागू आहे आणि ते वेळोवेळी लागू असलेल्या नियमांनुसार महागाई भत्ता, स्थानिक नुकसान भरपाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि ग्रेड भत्ता यासाठी पात्र असतील

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 ऑक्टोबर 2024
परीक्षा (Online): 21 नोव्हेंबर 2024