10वी पास उमेदवारांसाठी खुशखबर ! सेंट्रल बँक ऑफ इंडिया’मध्ये निघाली जम्बो भरती
Published On: डिसेंबर 21, 2023 12:38 pm

---Advertisement---
सेंट्रल बँक ऑफ इंडियाने भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार बँकेने सफाई कर्मचारी सह सब स्टाफ -या पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. १०वी पास उमेदवारांना बँकेत नोकरीची ही उत्तम संधी असणार आहे.
या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा असून ०९ जानेवारी ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. ही भरती प्रक्रिया परीक्षा आणि मुलाखतीद्वारे होईल. तेव्हा या भरतीमधील पदे, पदसंख्या, पात्रता वेतन आणि अर्ज प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
पदाचे नाव : सफाई कर्मचारी सह सब स्टाफ –
आवश्यक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी म्हणजेच SSC किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण
वयोमर्यादा – किमान १८ ते कमाल २६ वर्षे (मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना ०५ वर्षे सूट आहे.)
वेतनश्रेणी – १४ हजार ५०० ते २८ हजार १४५ रुपये.
अर्ज शुल्क – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ८५० रुपये आणि अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/पीडब्ल्यूबीडी उमेदवार/ महिला उमेदवार यांच्यासाठी १७५ रुपये.
निवड कशी होईल?
या पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि स्थानिक भाषा चाचणीद्वारे केली जाईल. पहिली परीक्षा ऑनलाइन घेतली जाईल आणि उमेदवाराला स्थानिक किंवा प्रादेशिक भाषेचे चांगले ज्ञान असणे आवश्यक आहे. असे झाले तरच ते अर्ज करू शकतात. परीक्षेची तारीख अजून आलेली नाही पण बहुधा फेब्रुवारी महिन्यात परीक्षा घेतली जाईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 जानेवारी 2024
परीक्षा (Online): फेब्रुवारी 2024
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online