10वी/12वी/पदवी उत्तीर्णांसाठी खुशखबर! महाराष्ट्र शासनाच्या ‘या’ खात्यात जम्बो भरती सुरु

10वी, 12वीसह पदवी उत्तीर्णांना महाराष्ट्र शासनाच्या नोकरीची एक उत्तम संधी चालून आलीय. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाअंतर्गत येणाऱ्या न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयात जम्बो भरती निघाली आहे.

या भरतीची अधिसूचना संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेले उमेदवारांना dfsl.maharashtra.gov.in/या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2024 आहे. या भरतीद्वारे एकूण 125 जागा भरल्या जातील .

या पदांसाठी भरती होणार?
1) वैज्ञानिक सहाय्यक (गट क) 54
2) वैज्ञानिक सहाय्यक (संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफीत विश्लेषण) (गट क) 15
3) वैज्ञानिक सहाय्यक (मानसशास्त्र) (गट क) 02
4) वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक (गट क) 30
5) वरिष्ठ लिपिक (भांडार) (गट क) 05
6) कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक (गट क) 18
7) व्यवस्थापक (उपहारगृह) (गट क) 01

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र पदवी किंवा न्यायसहायक विज्ञान विषयासह विज्ञान शाखेतील पदवी.
पद क्र.2: विज्ञान शाखेतील पदवी (Physics/Computer/Electronics /IT) किंवा इंजिनिअरिंग पदवी (Computer/Electronics /IT) किंवा B.Sc. (Forensic Science) किंवा PG डिप्लोमा (Digital and Cyber Forensic and Related Law)
पद क्र.3: मानसशास्त्र विषयातील द्वितीय श्रेणी पदवी
पद क्र.4: 12वी (विज्ञान) उत्तीर्ण
पद क्र.5: 12वी (विज्ञान) उत्तीर्ण
पद क्र.6: 10वी (विज्ञान) उत्तीर्ण
पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण (ii) कॅटरिंग क्षेत्रातील 03 वर्षे अनुभव

अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/अनाथ/आदुघ/दिव्यांग: ₹900/-]
वयाची अट: 27 फेब्रुवारी 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/अनाथ/आदुघ: 05 वर्षे सूट]
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 फेब्रुवारी 2024
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online