10वी/ITI/पदवीधरांसाठी खुशखबर! कोचीन शिपयार्ड लिमिटेड बंपर जागांसाठी भरती

कोचीन शिपयार्ड लिमिटेड (CSL Bharti 2023) मध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी मोठी संधी चालून आलीय. CSL ने विविध पदांच्या भरतीची जाहिरात काढली असून यासाठी पात्र उमेदवाराने लवकरात लवकर अर्ज करावा.

ही भरती शिकाऊ आणि व्यवस्थापक पदांसाठी होणार आहे.  त्यामुळे पात्र उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. लक्ष्यात असू द्या शिकाऊ उमेदवारीसाठी अर्ज 4 ऑक्टोबरपर्यंत आणि व्यवस्थापक पदांसाठी 8 ऑक्टोबरपर्यंत करता येईल. CSL Recruitment 2023 

रिक्त जागा तपशील
सहाय्यक व्यवस्थापक-2
वरिष्ठ व्यवस्थापक-1
व्यवस्थापक-8
उपव्यवस्थापक-1
सहाय्यक व्यवस्थापक-12
ITI ट्रेड अप्रेंटिसशिप-300
तंत्रज्ञ अप्रेंटिसशिप-8

आवश्यक शैक्षणिक पात्रता
असिस्टंट जनरल मॅनेजर-B.Tech आणि BE. तसेच 15 वर्षांचा कामाचा अनुभव असावा.
वरिष्ठ व्यवस्थापक- BE/B.Tech किंवा डिप्लोमा आणि 12 वर्षांचा कामाचा अनुभव.
मॅकेनिकल/इलेक्ट्रिकल/नेव्हल आर्किटेक्चर इंजिनीअरिंगमधील मॅनेजर-पदवी नऊ वर्षांच्या अनुभवासह.
उपव्यवस्थापक-पदवी आणि सात वर्षांचा कामाचा अनुभव.
सहाय्यक व्यवस्थापक- B.Tech/BE पदवी आणि तीन वर्षांचा कामाचा अनुभव.
ITI ट्रेड अप्रेंटिसशिप- 10वी उत्तीर्ण नंतर ITI पास.
तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी- उच्च माध्यमिक व्यावसायिक विषयात उत्तीर्ण.

वयाची अट :
या पदांसाठीच्या वयोमर्यादेबद्दल बोलायचे झाल्यास, सहाय्यक व्यवस्थापकासाठी कमाल वयोमर्यादा ४५ वर्षे, वरिष्ठ व्यवस्थापक आणि व्यवस्थापकासाठी ४० वर्षे, उपव्यवस्थापकांसाठी ३५ वर्षे, सहायक व्यवस्थापकासाठी ३० वर्षे आहे. तर शिकाऊ उमेदवारीसाठी किमान वयोमर्यादा १८ वर्षे आहे.

किती पगार मिळेल?
निवड झालेल्या उमेदवारांना पदांनुसार पगार दिला जाईल; दरमहा 9000/- ते 146560/- पर्यंत असेल

अधिकृत संकेतस्थळ : cochinshipyard.in

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
Online नोंदणी करण्यासाठी : येथे क्लीक करा