तुम्हीही 10वी/ITI पास/पदवीधर उमेदवार असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. ज्यांना या भरतीसाठी अर्ज करायचा आहे ते AAI च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 जानेवारी 2024 आहे.
AAI भरतीद्वारे एकूण 119 पदे भरली जाणार आहेत. ज्या उमेदवारांना या पदांवर नोकरी मिळवायची आहे त्यांनी खाली दिलेले मुद्दे काळजीपूर्वक वाचले पाहिजेत.
या पदांसाठी होणार भरती :
कनिष्ठ सहाय्यक (अग्निशमन सेवा)-73 पदे
कनिष्ठ सहाय्यक (कार्यालय)-02 पदे
कनिष्ठ सहाय्यक (इलेक्ट्रॉनिक्स)-२५ पदे
कनिष्ठ सहाय्यक (खाते)-१९ पदे
शैक्षणिक पात्रता :
उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून इयत्ता 10वी पास + 3 वर्षांचा मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/फायरमधील डिप्लोमा किंवा वैध अवजड वाहन ड्रायव्हिंग लायसन्ससह 12वी पास (नियमित अभ्यास) असावा.
इतके वेतन मिळेल :
या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना 36000 ते 110000 रुपये वेतन दिले जाईल
अर्ज कसा करावा?
AAI च्या अधिकृत वेबसाइट aai.aero ला भेट द्या.
मुख्यपृष्ठावरील AAI भर्ती 2023 लिंकवर क्लिक करा.
उमेदवारांकडे वैध वैयक्तिक ई-मेल आयडी आणि मोबाइल नंबर असणे आवश्यक आहे.
उमेदवारांनी त्यांचे नाव, ईमेल आयडी, मोबाईल नंबर इत्यादीसह काळजीपूर्वक अर्ज भरावा.
आता सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
यानंतर फॉर्म भरा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
भविष्यातील संदर्भासाठी त्याची प्रिंटआउट तुमच्याकडे ठेवा.
जाहिरात पहा : PDF